महाराष्ट्रातील नगरपरिषदा,नगरपंचायती कर्मचा-यांचे वेतनाची सहाय्यक अनुदानाची रक्कम दि.२२/०८/२०२० म्हणजे गणपती उत्सवापूर्वी न मिळालेस दि.२४/०८/२०२० पासुन महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कर्मचारी काम बंद व बोबांबोंब आंदोलन करणार

सध्या करोना विषाणु (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढलेला असताना नगरपरिषदे मधील मुख्याधिकारी, सर्व विभाग प्रमुख, संवर्ग कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, मुकादम, शिपाई, सफाई कामगार हे शहरातील भाजी मार्केटमधील गर्दी रोखणे, किराणा व मेडीकल दुकानात होणारी गर्दी रोखणे, शहरात बाहेर गांवाहून आलेल्या व येणा-या लोकांची प्रत्येक घर ते घर जाऊन माहिती घेऊन सर्व्हे करणे व डॉक्टरांच्या साह्याने तपासणी करणे, दररोज ज्या घरांचा सर्व्हे झाला आहे अशा घरातील संशयीत बाधीत रूग्ण यांचेवर लक्ष ठेवण्याचेही काम करीत आहे. इतर शासकीय विभागातील ५० % कर्मचारी शासनाच्या निर्देशानुसार कार्यरत आहेत परंतू नगरपरिषदे मधील सर्वच १०० % कर्मचारी करोना विषाणु (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्याचे काम आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत.

अशा परिस्थितीमध्ये नगरपरिषदेच्या सर्व कर्मचा-यांच्या वेतनासाठी देण्यात येणारी सहाय्यक अनुदानाची रक्कम ०१ ऑगस्ट २०२० रोजी महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदांना देणे आवश्यक असताना अद्यापपर्यंत वेतनाची सहाय्यक अनुदानाची रक्कम नगरपरिषदांना न मिळाल्याने महाराष्ट्रातील ३३९ नगरपालिकामधील कर्मचारी वेतनापासुन वंचित राहिले आहेत.

गणेश उत्सव साजरा करण्य़ासाठी गणेश उत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांचे वेतन मिळावे
 
दि.२२/०८/२०२० पूर्वी सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम नगरपरिषदांना न मिळाल्यास दि.२४/०८/२०२० रोजी महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदा ,नगर पालिके समोर काम बंद करून बोंबाबोंब आंदोलनकरणार असल्याची माहिती राज्याचे अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड, जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांनी दिली.
 
Top