समस्या सोडवण्यासाठी मी या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करणार

पंढरपूर ,(विजय काळे) - आ.रोहितदादा विचार मंचच्या पंढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी नवनाथ आसबे यांची निवड केल्याचे सोलापूर जिल्हाध्यक्ष योगेश देशमुख पाटील यांनी जाहीर केले.याप्रसंगी प्रदेश सचिव प्रा.मच्छिंद्र गोडसे सर उपस्थित होते.
  
    यावेळी बोलताना नुतन तालुका कार्याध्यक्ष  नवनाथ आसबे म्हणाले की,आ.रोहितदादांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी तसेच युवकांचे प्रश्न, सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी या तालुका कार्याध्यक्षपदाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून तरुणांना संघटीत करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आसबे यांनी सांगितले.

  यावेळी त्यांचेसमवेत गणेश पवार,बाबासाहेब काळे उपस्थित होते.
 
Top