गळफास घेऊन आत्महत्या

     पंढरपूर - जैनवाडी तालुका पंढरपूर येथील राहणाऱ्या सौ पूजा महेश लिंगडे वय वर्षे एकवीस हिने राहते घरी दिनांक १०/०८/२०२० रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याबाबत मयताचा दीर प्रशांत महादेव लिंगडे, राहणार जैनवाडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार दिवसे यांच्याकडे देण्यात आला होता.

त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

     या तपासादरम्यान मताचा भाऊ चैतन्य राजू भोसले, वय वर्षे २० ,राहणार कासेगाव तालुका पंढरपूर यांनी त्यांची मयत बहीण सौ पूजा महेश लिंगडे हीस तिचे सासरकडील नवरा महेश महादेव लिंगडे,दिर प्रशांत महादेव लिंगडे ,सासरे महादेव ज्ञानू लिंगडे, सासू जया महादेव लिंगडे सर्व राहणार जैनवाडी, तालुका पंढरपूर यांनी तुझे माहेरकडील लोकांनी लग्नात मानपान केला नाही, तुला स्वयंपाक नीट करता येत नाही या कारणा वरून जाचहाट केल्याने त्यांचेपासून होणाऱ्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिला आत्महत्या करण्यास वरील आरोपींनी प्रवृत्त केले म्हणून तक्रार पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणेत दिनांक १०/०८/२०२०  रोजी दिली. गुन्हा दाखल करून घेऊन याचा तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी हाती घेतला .या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा घडल्यानंतर फरारी झाले होते. त्यांचा शोध घेतला असताना दिनांक १२/०८/२०२० रोजी मयताचा नवरा आरोपी महेश महादेव लिंगडे हा मिळून आला. 

      त्याला गुन्ह्यात अटक केली असून सदरची कामगिरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे पंढरपूर विभाग यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहाय्यक पोलीस फौजदार दिवसे हे करीत आहेत.
 
Top