स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न


     पंढरपूर,दि.१५/०८/२०२०- स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर तहसिल कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा  शासकीय कार्यक्रम संपन्न झाला.

       यावेळी पंचायत समिती सभापती अर्चना वरगर, उपसभापती प्रशांत देशमुख,तहसिलदार डॉ वैशाली वाघमारे,गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक,नगरसेवक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर पोलीस पथकाने मानवंदना दिली.
 
Top