इंदापूर बस स्टॅन्ड समोरील मोकळ्या मैदानात मयत अवस्थेत

इंदापूर -इंदापूर पोलिस स्टेशन येथे अकस्मात मयत रजिस्टर नंबर ८५/२०२० crpc १७४ मधील अनोळखी पुरुष जातीचे वय अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील हे दिनांक २४/०८/२०२० रोजी ०६:०० वाजता मौजे इंदापूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे गावच्या हद्दीत इंदापूर बस स्टॅन्ड समोरील मोकळ्या मैदानात मयत अवस्थेत मिळून आले आहेत.

सदर अनोळखी मयत इसम हा रंगाने निमगोरा, अंगाने जाडजुड, डोकीस काळे केस असुन अंगात गुलाबी रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट, वीटकरी रंगाची फुल पॅन्ट व आतमध्ये नेसणीस विटकरी रंगाची अंडरवेअर आहे. मयताचे गळ्यामध्ये सहापदरी पांढरा रंगाचा दोरा (जान्हवे) आहे.

सदर अनोळखी मयताबाबत अगर मयताचे नातेवाईक यांचेबाबत आपणास माहिती मिळाल्यास इंदापूर पोलिस स्टेशन येथे खालील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन इंदापूर पोलिस स्टेशनच्यावतीने करण्यात आले आहे .

इंदापूर पोलीस स्टेशन- ०२१११/२२३३३३
तपासणी अंमलदार- पो.ना.पालके ८८०५४१३१००
 
Top