तंत्रज्ञानाचा उपयोग करून महिलांना स़ंवाद व्यासपीठ उपलब्ध करुन द्या

पुणे,(डॉ कुणाल दोशी),दि.०४ऑगस्ट,२०२० - महिला ग्रामसभा नजिकच्या काळात कोविडच्या आव्हानामुळे कठीण असल्याने तंत्रज्ञानाचा उपयोग करून महिला स़ंवाद व्यासपीठ देऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने प्रशासनास सूचना देण्याची आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली.

मंत्री ना.हसन मुश्रीफ यांचा मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद 

कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायत निवडणूक तसेच ग्रामसभा रद्द करण्याची वेळ आली आहे. दि.०३ ऑगस्ट, २०२० रोजी महाराष्ट्रच्या गडचिरोली, नागपूर, सोलापूर, लातूर, बीड, पुणे, मुंबई या तसेच इतर जिल्ह्यातील अंदाजे २२ अनेक संस्थांच्या प्रतिनिधी यांच्या सोबत शिवसेना प्रवक्त्या तथा माजी विधान परिषद उपसभापती आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. सदरील संस्था ह्या ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्नावर काम करणारे आहेत. या बैठकीत ग्रामीण भाग व महिला जीवन, समस्या यावर चर्चा झाली. ग्रामसभा रद्द केल्याने ग्रामीण भागातील विकासात अडचणी आल्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात अनेक वर्षे १५ ऑगस्ट च्या या दिवशी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात येते. यामध्ये रोजगार हमी योजना व विविध सामाजिक विषयांचे नियोजन करण्यात येते. या ग्रामसभेच्या आधी विशेष महिला ग्रामसभांची  देखील तरतुदीनुसार अनेक ठिकाणी  महिला  सहभागी  होत असत. आता या महिला ग्रामविकास कार्यात स्त्रियांना माहितीचा आधार व शासनाचे सहकार्य मिळावे यासाठी आ.डॉ.गोऱ्हे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी महिलांचे प्रश्न आणि ग्रामसभा दुरध्वनीवर दि. ४ आँगस्ट २० रोजी चर्चा केली. 

   यात अत्यंत सकारात्मक प्रतिसाद ना.श्री मुश्रीफ यांनी दिला व लवकरच आ.डॉ.गोऱ्हे यांनी दिलेल्या सूचनांवर आपण तसे पाऊल टाकले जाईल असे आश्वासन दिले. यासाठी आ.डॉ.गोऱ्हे यांनी पुढील सूचना आणि कार्यपद्धती ग्रामविकास विभागास सुचविल्या आहेत.

१)  महिला ग्रामसभा घेण्यासंदर्भात काही निर्णय होत नाहीत तो पर्यंत ठोस व शासनाच्या ,आपल्या पुढाकाराने संवादाच्या पद्धतीची तंत्रज्ञानाच्या साहाय्याने (whats app व दुरध्वनी) अंमल बजावणी करण्यात यावी.

२) या संवादात महिला सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध ग्रामविकास योजनांचे लाभधारक, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी यांना सामील करून घेण्यात यावे.

३) या संवादातून समोर आलेल्या प्रश्नावर पंचायत समिती गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे जिल्हापरिषद उप मुख्यअधिकारी यांनी व्हिडीओ यांच्यामार्फत महिलांचे प्रश्न सोडविण्यास आवश्यक सुचना देऊन त्यांचे मिनीटस ठेवण्यात यावे.तसा अहवाल वरिष्ठ अधिकारी वर्गाकडे देण्यात यावा.

४) महिलांकडून वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी महिलांकडून आल्या तर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी यावर संबंधित विभागाला असून त्या तक्रारीचे निराकरण करण्यात यावे. 

५) सर्वसाधारण ग्रामसभेचे नियोजन ही होण्यास बराच वेळ लागणार असेल तर त्याबाबत सरपंच, जिप,पंचायत समिती प्रतिनिधी,आमदार,खासदार यांच्यासोबत व्हिडीओ काँन्फरन्स करुन मार्ग काढावा यासाठी तात्काळ निर्णय घेण्याची मागणी आ.डॉ.गोऱ्हे यांनी निवेदनाच्या व दूरध्वनीवरून ना.श्री मुश्रीफ यांना केली आहे.
 
Top