धोकादायकरित्या अनाधिकृत गॅस सिलेंडर टाक्यां भरताना स्फोट 


पंढरपूर - महेश गणपत जाधव वय-३२ वर्षे, पुरवठा निरीक्षक, तहसिल कार्यालय, पंढरपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहूल अशोक भोंगळे, वय-३६ ,रा-गजानन महाराज मठामागे, संतपेठ, पंढरपूर यांच्या विरोधात जिवनावश्यक वस्तु पुरवठा विभागाअंतर्गत दुकानातुन जनसामान्यां साठी शासनाकडून वितरीत होत असलेल्या गॅस सिलेंडर टाक्यांमधील गॅस बनावट अनाधिकृत रेग्युलेटरव्दारे धोकादायकरित्या अनाधिकृत गॅस सिलेंडर टाक्यांमध्ये भरण्याचे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केले त्यामुळे त्याच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाणेमध्ये गु.र.नं- 611/2020 भा.दं.वि. का.कलम 285,336,427 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दि.१४/०८/२०२० रोजी ०३/२४ मिनिटांनी नोंद करण्यात आला .
   
    हा गुन्हा घडला दि.१२/०८/२०२० रोजी दुपारी १२.३० वा. चे सुमारास जगदंबा वसाहत, महात्मा फुले चौक,संतपेठ, पंढरपूर येथे घडला होता.यात प्रापंचीक सामनास आग लागून ५७९००/- रू. किंमतीचे नुकसान झाले आहे.याचा तपास पंढरपूर शहर पोलीस ठाणे पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

हे जिवंत बॉम्ब प्रवाशांना घेऊन गावभर फिरतात

अशा प्रकारे शासनाकडून वितरीत होत असलेल्या गॅस सिलेंडर टाक्यांमधील गॅस बनावट अनाधिकृत रेग्युलेटरव्दारे धोकादायकरित्या अनाधिकृत गॅस सिलेंडर टाक्यांमध्ये भरण्याचे काम करणारे स्वतः बरोबर इतरांचाही जीव धोक्यात टाकत आहेत. अनेक रिक्षांसह इतरही वाहनांमध्ये बेकायदेशीर मार्गाने गँस टाक्या भरत आहेत आणि हे जिवंत बॉम्ब प्रवाशांना घेऊन गावभर भाडी करत फिरत असतात.
 
Top