हि मूूूूर्ती हेमंत ओक,तळेगाव(नागपूरकर) यांनी घरी बनविली

   नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर),२२/०८/२०२० -
 वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभः 
निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा 
कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात आपण गणपती पूजनाने करतो. गणेशाचे बालरुप जितके मोहक आहे,तितकीच त्याची शक्ती,युक्ती, विवेक बुद्धीही चाणाक्ष आहे. गणपती केवळ विघ्नहर्ता नाही तर तो बुद्धीदाता आणि समृद्धीकारकही आहे. चातुर्मासातील दुसरा महिना भाद्रपद. भाद्रपद महिना हा मुख्यत्वे करून गणपती पूजनासाठी ओळखला जातो.भाद्रपद चतुर्थीपासून ते चतुर्दशीपर्यंत घरोघरी श्रीगणेशाचे पार्थिव पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. यंदा शनिवार २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. प्रत्येक घरी आपापल्या आवडीनुसार, मनमोहक गणपतीची मूर्ती आणली जाते. गणेश पुजन ही अर्चनाभक्ती मानली जाते कर्मकांडापेक्षा उपासनाकांड श्रेष्ठ आहे .गणेशाची उपासना करत असताना ॐ गणपतये नम:  हा नामजप अधिकाधिक वेळा करावा असे आवाहन मनोहर महाराज भगत जेष्ठ किर्तनकार नातेपुते यांनी केले आहे. नामस्मरण करा, नामस्मरण हेच गणेशाच्या जवळ जाण्याचे प्रवेशद्वार आहे. गणेशाच्या केवळ नामोच्चाराने चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनात शरीरात आणि वातावरणात नेहमीच होतो. बुद्धिदाता, गणांचा अधिपती, सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता, संकटनाशक अशा कितीतरी वरदांनाने प्रसिद्ध असलेल्या गणेशाची घरोघरी नामस्मरण  उपासना पूजा करा गणेशचतुर्थी म्हणजे आनंदाचा परमावधी गणेशचतुर्थी म्हणजे निसर्गाची सुगी गणेशचतुर्थी म्हणजे मांगल्याची पर्वणी गणेश चतुर्थी म्हणजे पवित्र्य मंगळ नामस्मरणास संधी  गणेशपूजनाची व नामजपाची परंपरा वैदिक काळापासूनच आहे .


     पृथ्वी आप तेज वायु जल सर्वांचा पती म्हणजे गणपती. अगदी लहानपणी पहिल्यांदा शिक्षणाचा प्रारंभ होतो तो श्रीगणेशाने, ग ण प ती असा हा गणपती म्हणजे कोट्यावधी लोकांचे श्रध्दास्थान गणेशाचा उल्लेख अगदी प्राचीन ग्रंथापासून आढळतो. गणपतीचा प्रथम उल्लेख ऋग्वेदात आढळतो हा वैदिक गणपती व  नंतरचा पौराणिक गणपती त्या ऋग्वेदातील गणपतीपासुनच पौराणिक गणपतीचे रुप उद्भवले आहे.शिव पुराण, स्कंद पुराण, बृहध्दर्म पुराण, ब्रम्हवैवर्त पुराण, पद्म पुराण,लिंग पुराण,वराह पुराण, देवी पुराण, मत्स्य पुराण,वामन पुराणात गणपतीचे उल्लेख सापडतात.
 
Top