विविध देशातील स्पर्धकांतून पहिल्या ५० स्पर्धकांत चौथीसावा  ethical hacking om harwalkar 34 th
पंढरपूर - गोपाळपूर ता पंढरपूर येथील स्वेरीमध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये  इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षात शिकत असणाऱ्या ओम जगन्नाथ हरवाळकर यांनी इथिकल हॅकिंग स्पर्धेमध्ये ३४ वा क्रमांक मिळवला.मास्टर इन इथिकल हॅकिंग या ऑन लाईन स्पर्धेमध्ये विविध देशातून स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामधून पहिल्या ५० स्पर्धकांची निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना वेगवेगळ्या टास्क देण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये दिलेल्या आकृती मधून गूढ शब्द शोधून काढणे, तसेच विविध संगणक हॅक करणे यामधून ज्यांनी कमी वेळेत हे टास्क पूर्ण केले अशा ५० स्पर्धकांची निवड करण्यात आली. आयटी या क्षेत्रात आता इथिकल हॅकिंगच क्षेत्रही मोठं होत आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सिक्युरिटी, आयटी सेल मध्ये नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. ओम हरवाळकर यांनी मिळवलेलं हे यश कौतुकास्पद आहे.

 या यशामुळे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांनी ओम यांची पाठ थोपटली. यावेळी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. अवधूत भिसे, ओमचे वडील जगन्नाथ हरवाळकर हे उपस्थित होते. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त,स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार,डिप्लोमाचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ,स्वेरी अंतर्गत इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी ओमचे अभिनंदन केले आहे .
 
Top