महाराष्ट्रातही ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम मात्र ई-पासची अट रद्द, ठाकरे सरकारचा निर्णय

   मुंबई,(संभाजी वाघुले),३१/०८/२०२०- राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला होता त्याचवेळी खासगी वाहनांवर असलेल्या ई-पासची अट मात्र तशीच ठेवली होती त्यामुळे या निर्बंधां बाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला.अनलॉक ४ संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत. प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्यांतर्गत व आंतरराज्य प्रवासासाठीहि ई-पासची गरज नाही

अनलॉक ४’ ची नियमावली जाहीर करताना केंद्र सरकारने मेट्रो सेवा,सार्वजनिक कार्यक्रम, शैक्षणिक संस्था यांना अंशत: परवानगी दिली. तसंच राज्यांतर्गत व आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची गरज नसल्याचेही केंद्र सरकारने म्हटलं होतं. 

  केंद्र सरकारकडून घोषणा झाल्यानतंर राज्य सरकारच्या नियमावलीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यात कोणत्या सवलती देता येतील याचा आढावा घेण्यात आला त्यात राज्य सरकारने खासगी तसंच मिनी बसेसना परवानगी दिली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्णपणे सुरु होण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने शाळा,कॉलेज या शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असून याशिवाय चित्रपटगृह,स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क,बार,सभागृह तसेच जिम सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
 
Top