दाऊद इब्राहिम गेली २७ वर्षे पाकिस्तानमध्ये लपून राहिलेला आहे


मुंबई दि.२३/०८/२०२० -  मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी सिरीयल बाँम्बस्फोट घडविणारा प्रमुख गुन्हेगार दाऊद इब्राहिम गेली २७ वर्षे पाकिस्तान मध्ये लपून राहिलेला आहे. याची पाकिस्तानला पूर्ण माहिती आहे मात्र तरीही दाऊद भारताच्या सुपूर्द करण्यास पाकिस्तान भारताला सहकार्य केले नाही.आता मात्र पाकिस्तानमधील ८० दहशतवादी गुन्हेगारांची नावे पाकिस्तान सरकारने जाहीर केलीत त्यात दाऊदचे नाव आहे. त्यामुळे आता पाकिस्तानने त्वरित दाऊद इब्राहिमला भारताच्या हवाली करावे त्यासाठी भारत सरकार ने ही पाकिस्तानवर दबाव टाकला पाहिजे असे मत व्यक्त करून आपण गृहमंत्रालयाला याबाबत पत्र पाठविणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  म्हटले आहे. 

दाऊदला फाशीची शिक्षा झाली पाहिजे - ना. रामदास आठवले 

      दाऊद इब्राहिम हा मूळचा मुंबईचा असून त्याच्यावर अनेक खंडणीचे आणि खुनाचे गुन्हे नोंद आहे. संघटित गुन्हेगारीमध्ये लिप्त असणारा आणि पुढे मुंबईत साखळी बॉम्बस्फोट करून आंतर राष्ट्रीयस्तरावर दहशतवाद्यांसारखे क्रूर गुन्हे घडविणाऱ्या दाऊदला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.त्यासाठी पाकिस्तानने दाऊदला भारताच्या हवाली करावे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे. 
 
Top