‘कोविड-19 वॉर रुम’ पंढरपूरला कार्यान्वित

पंढरपूर, (संभाजी वाघुले) - कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी  आवश्यक माहिती तसेच कोरोना बाधित रुग्णांना आरोग्य विषयक सुविधेची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी  प्रांत कार्यालय पंढरपूर येथील सांस्कृतिक भवन येथे ‘कोविड-19 वॉर रुम’ कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

   कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासना कडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रसार पाहता. या परस्थितीवर नियत्रंण ठेवण्यासाठी कोविड केअर सेंटर,डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर,डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल येथील कामकाजाचे सनियंत्रण करण्यामध्ये कोविड-19 वॉर रुम महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामध्ये रुग्णालयातील उपलब्ध बेड, आय.सी.यु बेड, दाखल रुग्णांची संख्या, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या, डिसचार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील उपचार, स्वच्छता आदीबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी यांनी सांगितले.

       वॉर रुम २४ × ७ कालावधीसाठी सुरु 

   तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या कोरोना आजाराबाबत समस्या तात्काळ सोडविण्यासाठी तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्य सुविधेची माहिती उपलब्ध होण्यासाठी कोविड-19 वॉर रुमची स्थापना केली  आहे. ही वॉर रुम २४ ×७ कालावधीसाठी सुरु असून,कोरोना आजाराबाबत सुविधा व समस्या बाबत 02186-222020 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे,आवाहन तहसिलदार डॉ वैशाली वाघमारे यांनी केले आहे.
 
Top