रॅपिड अँटीजन तपासणी करण्यासाठी 

पंढरपूर - पंढरपूर शहरातील नागरिकांना covid-19 बाबतची रॅपिड अँटीजन तपासणी करण्यासाठी शहरातील विविध लॅबचे चालक डॉक्टरांची मिटिंग आज आमदार प्रशांत परिचारक यांच्या समवेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले, उपमुख्यअधिकारी सुनील वाळुजकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी,पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, नगरसेवक संजय निंबाळकर यांच्यासमवेत संपन्न झाली.

शासनाने ५ खाजगी लॅबधारकांना गाईड लाईन दिले  

 यावेळी डॉ एकनाथ बोधले यांनी उपस्थित डॉक्टरांशी चर्चा करताना पंढरपूर शहरांमध्ये कोरोनाग्रस्त पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता अनेक नागरिक खाजगी लॅबमध्येही तपासणी करू इच्छितात त्यामुळे शासनाने खाजगी ५ लॅबधारकांना ही तपासणी सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात गाईड लाईन दिलेले आहेत. यामध्ये संबंधित लॅबनी सिव्हिल सर्जन सोलापूर यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्याचा आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर त्वरीत संबंधित लॅब हे आपल्या लॅबमध्ये कोविड-19 ची तपासणी करू शकतात.

  यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की,पंढरपूर शहरातील व तालुक्यातील, आसपासच्या मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस या तालुक्यातील नागरिकांनासुद्धा ही covid-19 ची तपासणी सेवा उपलब्ध होणार आहे.त्यामुळे आपण प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवून नागरिकांना कोविड 19 ची सुलभ सेवा उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले.
 
Top