डॉ.सचिन दोशी यांचा मृत्यू धक्कादायक
 
  पंढरपूर - कोरोनामुळे पंढरपूर येथील डॉ.सचिन रमणलाल दोशी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पुणे येथील नोबेल हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. 

  मुळचे खटाव,जि.सातारा येेेेथील डॉ.सचिन रमणलाल दोशी यांचा कासेगाव,ता.पंढरपूर येथे 'सन्मती क्लिनीक या नावाचा दवाखाना आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी ते कोरोना बाधीत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी पंढरपूर तालुक्यात लोकप्रियता मिळवली होती.समाजाच्या प्रत्येक कार्यात ते सदैव अग्रभागी असत.   
 
Top