आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांना कोरोनाची लागण

नगरपालिकेचे आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या तब्येतीमधे सुधारणा झाली असून ते आता लवकरच जनतेच्या आरोग्य सेवेस पुन्हा रुजु होणार आहेत.


      गेल्या सहा महिन्यांपासुन आमदार प्रशांत परिचारक,प्रांताधिकारी सचीन ढोले,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती परदेशी यांनी आरोग्य विषयक नियोजनबद्ध काम केले. शहरामध्ये कोरोनाबरोबर साथीचे रोग नियंत्रणात आणण्यासाठी विविध स्तरावर नवनवीन उपाय योजना आखल्या व अंमलात आणल्या.आरोग्य सभापतीपद स्विकारल्यापासून शहरातील विविध भागात जनजागृती करणे, रुग्णांना मदत करणे, जनतेचे आरोग्य विषयक प्रश्न सोडवणे, सफाई कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या अडचणी सोडवणे हा त्यांचा नित्यक्रम होता.कोरोना विषयक सोशल मिडियाद्वारे जनजागृती करण्या बरोबर आरोग्य विषयक नवनवीन माहिती त्यांनी नागरिकांना दिली.आरोग्य विभागाचे काम अत्याधुनिक आणि तात्काळ व्हावे यासाठी स्वतः लक्ष घालुन अमुलाग्र बदल केले.निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने नगर पालिकेस बॅटरीवरील ८ ऑटोमॅटिक इलेट्रॉनिक मशीन तसेच नगरपालिका दवाखान्यासाठी पीपीई किट, सर्व कर्मचारीं, नगरपालिका आरोग्य कर्मचारी यांना प्रतिकारशक्ती वाढणारी अर्सेनिक अल्बम ३० हे औषध घरोघरी जाऊन दिले आहेत. 
              
    शुक्रवार दि.७ ऑगस्ट रोजी परदेशीनगर येथे परेदेशी क्लिनीकमध्ये रॅपिड अँटीजन टेस्टच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कँप मध्ये प्रांतधिकारी सचीन ढोले यांनी सपत्निक स्टेस्ट केली. त्यानंतर आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांच्या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शासनाच्या निर्देशाचे पालन करुन सभापती परदेशी होम कॉरंटाइन झाले.यानंतर प्रांत सचिन ढोले,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगराध्यक्षा साधनाताई भोसले ,आमदार प्रशांत परिचारक,आई वडिल,मित्र नातेवाईक ,नगरसेवक यांनी मोबाईलद्वारे परदेशी यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेेच्छा दिल्या आहेत .  

 आपण लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजु होणार असल्याचे आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले.
 
Top