मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे


     पंढरपूर दि.०६/०८/२०२० -  जिल्ह्यासह तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आजाराची लक्षणे असणाऱ्या व कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात रॅपिड ॲटिजेन टेस्ट करण्याची मोहिम राबविणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली.

नागरिकांची ॲटीजेन टेस्ट घेण्याची मोहिम

      तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.तालुक्यात भोसे,खेडभोसे व रोपळे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने त्यांच्या संपर्का तील नागरिकांची व आजाराची लक्षणे असणाऱ्या  नागरिकांची ॲटीजेन टेस्ट घेण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये आज १७५ रॅपिड ॲटिजेन टेस्ट घेण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. यासाठी  ज्यांना आजाराची लक्षणे आहेत तसेच कोरोनाच्या संपर्कात आले नागरिकांनी पुढे येवून आपली आरोग्य तपासणी करावी जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग तत्परतेने रोखण्यासाठी आणि बाधितांना तत्परतेने उपचार सुरु करणे शक्य होईल असे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सांगितले.

सर्दी,ताप,खोकला,श्वसनाचा त्रास असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन घ्या

      जे नागरिक आजाराची लक्षणे अथवा कोरोना बाधितांच्या सपर्कात असून देखील तपासणीसाठी पुढे येत नाहीत अशा नागरिकांसाठी शोध मोहिम राबवून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली जाणार आहे.हि मोहिम तालुक्याच्या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांत राबविण्यात येणार आहे.ज्यांना सर्दी, ताप, खोकला व श्वसनाचा त्रास अशी लक्षणे आढल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी केले आहे.
 
Top