पंढरपूर,(प्रतिनिधी )-सोलापूर जिल्ह्यात तुलनेने पंढरपूर तालुक्यात अधिक रुग्ण रॅपिड अँटीजेन तपासण्या वाढल्यामुळे सापडत आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन अविरत परिश्रम घेत असून त्याचाच एक भाग म्हणून रॅपिड अँटीजेन टेस्ट मोहीम पंढरपूर शहरासह तालुक्या तही राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे रुग्णांची संख्या जरी वाढलेली दिसत असली तरी प्रशासनाने शोधून काढलेल्या या रूग्णांमुुुळे नवीन कोरोना रुग्ण वाढण्यास अटकाव करण्यासाठी मदतच होणार आहे. मात्र प्रशासनाने अपेक्षा केली होती त्याप्रमाणात नागरिकांचा या तपासणीसाठी म्हणावा तेवढा काही गैरसमजातून प्रतिसाद नाही. त्यामुळे प्रशासनाचेवतिने प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गट विकास अधिकारी रविकिरण घोडके,नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले, तहसिलदार डॉ वैशाली वाघमारे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने तपासणीसाठी प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले आहे.

पंढरपूर तालुक्यात १२६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागा तही २८८ रुग्ण सापडले आहेत.
                       
  आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात ८२ आणि ग्रामीण भागात ४४ असे १२६ रुग्ण आढळले आहेत. पंढरपूर शहरात संतपेठेत २० रुग्ण ,ग्रामीण भागात कौठाळी येथे १२ रुग्ण, तुंगत येथे ४,आढीव,भोसे,गादेगाव,गोपाळपूर, गुरसाळे, इसबावी, करकंब,करोळे, कासेगाव, कौठाळी, खर्डी, टाकळी (३), मेंढापूर, मुंढेवाडी, औरांझणी, रोपळे, उंबरे, वाखरी अशा विविध गावात हे रुग्ण आढळले आहेत. आढीव येथील एका ६५ वर्षे वयाच्या महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे .

  शहरात सावतामाळी मठ येथे ८ , लकेरी गल्ली येथे १० रुग्ण ,आंबेडकर नगर, अनिलनगर, फरतळे दिंडी जवळ, गजानन महाराज मठ, नागपूरकर मठ, भजनदास चौक, भक्ती मार्ग, भुवनेश्वरी मठ, डाळे गल्ली, डोंबे गल्ली, गाताडे प्लॉट, हरिदास वेस, जुनी पेठ, कडबे गल्ली, कवठेकर गल्ली, महापूर चाळ, महावीर नगर, मटण मार्केट, नवा बागवान मोहल्ला, पंचमुखी मारुती,पुंडलिकनगर,संभाजी चौक,सांगोला रोड, सावंत माळी मठ या भागात हे रुग्ण आढळले आहेत.  
 
Top