उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे यशस्वी उपचारानंतर १६ जण कोरोना मुक्त

 पंढरपूर, दि १२/०८/२०२०- कोरोनाविरुद्धच्या लढाईत पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकां साठी उपजिल्हा रुग्णालय वरदान ठरत असून आतापर्यंत एकूण २६ गंभीर रुग्ण कोरोनापासून मुक्त झाले असून आज १६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, असे आजपर्यंत एकूण ४२ रुग्ण उपजिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन व्यवस्थित घरी गेले आहेत.


  प्रांताधिकारी सचिन ढोले ,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर ,नगरसेवक विक्रम पापरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर १६ रुग्णांना पुष्पवृष्टी करून व टाळ्या वाजवून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ जयश्री ढवळे यांनी दिली.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत उपजिल्हा रुग्णालय ठरतेय गंभीर रुग्णांसाठी वरदान 

  पंढरपूर येथे कोरोना आजारावर यशस्वी उपचार करून पंढरपूर शहरातील ११, ग्रामीण भागातील ५ असे एकूण सोळा जणांना डिस्चार्ज देण्यात आला .यामध्ये सर्वच रुग्ण हे निमोनिया झालेले व शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेले होते यामध्ये ७५ वर्षावरील वय असलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. 

  सदर covid-19 पॉझिटिव रुग्णांवर खाजगी फिजिशियन डॉ अमित पावले तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे भूलतज्ञ डॉ आनंद पुरी, फिजिशियन डॉ सचिन वाळुजकर ,नोडल ऑफिसर डॉ प्रदीप केचे यांनी यशस्वी नियोजन व औषधोपचार केले . डॉ प्रसन्न भातलवंडे ,डॉ संभाजी भोसले तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी आणि श्रीमती रेखा ओंभासे प्र सहा अधीसेविका यांच्या मार्गदर्शना खाली कोविड वॉर्डात काम करणारे सर्व अधिपरिचारिक व अधिपरिचारिका ,कक्ष सेवक तसेच प्रयोगशाळा व एक्सर तंत्रज्ञ आणि स्वच्छता कर्मचारी यांनी अत्यंत समर्पक भावनेने रुग्णांची सेवा सुश्रुषा केली व विशेष परिश्रम घेतले.

    याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात असून यापुढेही असेच काम सुरू रहावे आणि लवकरच कोवीड हाँस्पिटल उभारणी व्हावी अशी अपेक्षा करताना दिसत आहेत. 
 
Top