भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे अजित प्रकाश संचेती यांना कोरोनाची लागण brp public relation head - coronavirus 

    पिंपरी चिंचवड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागल्यापासून बंदी करून ठेवलेल्या लोकांना धान्य वाटप अन्नदान लोकांमध्ये जाऊन करणाऱ्या भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे जनसंपर्क प्रमुख अजित प्रकाश संचेती महाराष्ट्र राज्य यांना कोरोनाची लागण झाली आहे . जूनमध्ये त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती.

जुलै व ऑगस्ट मध्ये वाढत असलेले रुग्ण व काही रुग्णांना हॉस्पिटल मिळत नव्हती आय सी यु मिळत नव्हते यासाठी ते स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याना भरती करून घेण्यास मदत करत होते,कोणाची बिल जास्त आले तर बिले कमी करण्यासाठी हॉस्पिटल जाणे,काही दिवसांपूर्वी आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये नर्स आणि डॉ यांचा स्टाफ यांनी सुरू केलेल्या आंदोलनाता बिर्ला हॉस्पिटलचे प्रशासन यांच्यामध्ये मध्यस्ती करून त्यांच्या समस्या समजून सांगितल्या.

      अजित संचेती यांच्यावर पिंपरी चिंचवड पॉलिटेकनिकमध्ये उपचार सुरू आहेत .कोरोनाला हरवून ते लवकरच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी येतील अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. 
 
Top