*शिबीरात ७०० जणांनी केले रक्तदान *


  पंढरपूर ,(प्रतिनिधी) - नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यावतीने गोपाळपूर ता. पंढरपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या रक्तदान शिबिरामध्ये ७०० जणांनी रक्तदान केले.

     राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून डाँ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील गोपाळपुर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात होते यामध्ये ७०० जणांना आपली नाव नोंदणी केलेली आहे . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रंगराव कुलकर्णी, काकासाहेब शिंदे,भोजने वकील, कृष्णा यवनकर,उदय पवार, प्रशांत पवार,दिलीप गुरव, शिवाजी, विठ्ठल पवार , डॉ पी एस पाटील, अमोल म्हात्रे,किरण शहा,विजय वरपे यांच्यासह गोपाळपुर ग्रामस्थ व समर्थ दास समितीचे सदस्य उपस्थित होते.
 
Top