शिवक्रांती संघटनेच्यावतीने रक्तदान शिबीर

पंढरपूर, दिनांक २३/०८/२०२० - गणरायाच्या आगमनानिम्मित कोरोनाच्या विरोधात लढा देण्या साठी आज शिवक्रांती संघटनेच्यावतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते .रक्तदान शिबीराचे उदघाटन उद्योजक माऊली निकते यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ काळे यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.


कोरोना काळातील शिवक्रांती संघटनेने आयोजित केलेले हे दुसरे शिबीर आहे. या शिबिरात सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करण्यात आले. या शिबिरात ३० जणांनी रक्तदान केले.


जगावर आलेले संकट लवकरात लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना

जगावर आलेले संकट लवकरात लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना यावेळी उपस्थित युवा वर्गाने गणराया जवळ केली.शिवक्रांती संघटना संवेदनशीलपणा व सामाजिक बांधिलकी जपत नैसर्गिक वा मानव निर्मित आपत्तीत समाज कार्य करणारी संघटना असून समाजाच्या विविध स्तरातुन शिवक्रांती संघटनेच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवक्रांती युवा संघटनेचे पंढरपूर शहराध्यक्ष माऊली चव्हाण, शहर उपाध्यक्ष विकी काळे,प्रसिद्धी प्रमुख रणजित सावंत,शहर संघटक मंगेश श्रीखंडे,माऊली काळे, कल्याण झेंड, ज्ञानप्रसाद शेटे,अजित शिंदे,रविंद्र गोरे यांनी परिश्रम घेतले.
 
Top