वसंतराव काळे प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...

      पंढरपूर,(प्रतिनिधी)- गुणवत्ता वाढीसोबत विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना वाव देत स्वतःमध्ये बदल करणे अपेक्षीत आहे असे सांगून प्रयत्न आणि सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते असे प्रतिपादन श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी वाडीकुरोली येथील वसंतराव काळे प्रशालेत गुणवंत विद्यार्थी सत्कार व सेवानिवृत्ती सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरुन बोलताना केले.

यावेळी संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी, साहित्यीक शिवाजीराव बागल प्राचार्य एच.आर. जमदाडे, शिवाजी शेंडगे, संतोष गुळवे, अनिल कौलगे, मुख्याध्यापक दादासो खरात आदि मान्यवर उपस्थित होते 

  याप्रसंगी इयत्ता १० वी मध्ये प्रथम पुजा सावंत, द्वितीय रोहिणी काळे, तृतीय समृध्दी सावंत, इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रथम कु.सानिया शेख, द्वितीय कु.कोमल सुरवसे,तृतीय कु.अक्षदा पंडीत , कला शाखेत प्रथम प्रथमेश यलमार, द्वितीय चेतक येड्रावकर, तृतीय किरण डावरे या गुणवंत विद्यार्थ्यांचा व आपल्या सेवेतून नियत वयोमाना नुसार सेवानिवृत्त झालेबद्दल एल.डी.मिसाळ सर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सहशिक्षक डी.जे. यलमार, शिवाजीराव बागल, बाळासाहेब काळे गुरुजी यांची समायोजित भाषणेे झाली. 

 कार्यक्रमाचे सुत्रसंचलन समाधान काळे यांनी केले उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. आर.कुलकर्णी यांनी केले.
 
Top