राजकारणात नकली बियाणे उगवत  नाही 
उसनवारीवर दुकान फार काळ चालत  नाही 
फंदफितूरानी कितीही गाजावाजा केला
तरी किंमत येत नाही पैसा पेरला म्हणून 
वांझोट उगवत नाही "
इतर वहिवाटीची नोंद कबजेदार सदरी लागत नाही

खरं काय अन खोटं काय ? तेच तर........

कांही वेळा डोळेझाक करावी लागते 
कांही वेळा तोंडाला कुलूप लावावे लागते 
कांही वेळा नको त्यांच्या पाया पडावे लागते 
कांही वेळा सारं सोडावे लागते 
आत चाटायाचे अन बाहेर मिरवायचे असते 
कांही वेळा खरेदी ,कांही वेळा उधारी 
हे सर्व करावं लागतं 
गरजेनुसार खरं खोटं बोलावं लागते 
चालवावे लागत तेच तर सत्तेचं राजकारण असते!!

आनंद कोठडीया,जेऊर ता.करमाळा
९४०४६९२२००


 
Top