
उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांचा सन्मान
मुंबई - महसूल विभागात क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा महसूल दिनी एक ऑगस्ट रोजी गौरव सन्मान करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या संकल्पने प्रमाणे सन २०१९-२०२० च्या वर्षाकरिता जिल्हा मुुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी प्रशासनाअंतर्गत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना बेस्ट उपजिल्हाधिकारी सन २०१९-२०२० च्या करिता प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले तसेच ॲडिशनल कलेक्टर विवेक गायकवाड यांनाही सन २०१९-२०२० च्याकरिता प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले .पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार
जिल्हा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी बोरीकर उपस्थित होते.