सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित 

 पंढरपूर -माजी आमदार सुधाकरपंत परिचारक आणि श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक राजूबापू पाटील यांना श्रद्धांजली (condolence meeting )वाहण्यासाठी शुक्रवार दिनांक २१ ऑगस्ट २०२० रोजी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांच्या निधनाने राजकीय,सामाजिक, शैक्षणिक ,कृषी अशा सर्वच क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. हि पोकळी कधीही न भरून येणारी आहे. या दोन्ही नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले अशी माहिती आमदार भारत भालके यांनी दिली आहे.

पंढरपूर येथील श्री संत तनपुरे महाराज मठामध्ये दिनांक २१/०८/२०२० रोजी दुपारी चार वाजता ही सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा होणार आहे तरी सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व नागरिकांनी या श्रद्धांजली सभेसाठी उपस्थित रहावे असे आवाहन पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी केले आहे.
 
Top