दुसरा हप्ता पोळा सणासाठी २००रू देणार

 उस्मानाबाद (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील चोराखळी, ता कळंब येथील धाराशिव साखर कारखाना युनीट १ या साखर कारखान्याने गेल्या वर्षी सन २०१९ -२० गळीत हंगामात शेतकरी सभासदांनी दिलेल्या ऊसाला पहिला हप्ता २१००रू. दिला होता तर दुसरा हप्ता पोळा सणासाठी २००रू देण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी घोषित केले आहे.

कर्मचारी आणि शेतकरी सभासदाचे हिताचे निर्णय -चेअरमन अभिजीत पाटील

सन २०१९ -२० उस गाळपास पाठविलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला एफआरपीपेक्षा जास्त दर देणार असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी घोषित केले होते. दिलेला शब्द पाळत कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचणीत शेतकरी आला असल्याने शेतकर्याना आर्थिक आधार मिळणार आहे.यंदा पाऊसकाळ चांगला असल्याने या पैशातुन पोळा,लक्ष्मी, गणपती सणासाठी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास, उसाची जोपासणूक करून खत तसेच पिकावरील फवारण्या साठी या पैशाचा फायदा होणार आहे .कारखाना नेहमी कर्मचारी आणि शेतकरी सभासदाचे हिताचे निर्णय घेत असून सर्वांच्या सुख दुःखात नेहमी डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील सहभागी असतात.


यावेळी शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात दुसऱ्या हप्त्याचे दोनशे रुपयांचे चेक घरपोच मिळतील असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.
 
Top