प.पू.१०८ प्रथमाचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ६५ वी पुण्यतिथी घरातूनच साजरी करण्याचे वीर सेवा दलाचे आवाहन..

फेसबुक पेजवरून लाईव्ह कार्यक्रमांचे आयोजन

दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने प.पू.१०८ प्रथमाचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ६५ वी पुण्यतिथी वीर सेवा दलाच्या वतीने गुरुवार दि २० ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे.कोरोना महामारीमुळे यावर्षीची पुण्यतिथी वीर सेवा दल सदस्य,कार्यकर्ते, श्रावक श्राविका यांनी घरातूनच संपन्न करावी असे आवाहन वीर सेवा दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुण्यतिथी निमित्त १६ ते १९ ऑगस्ट अखेर लाईव्ह धर्मज्ञान संस्कार शिबीर तर २५ ते २८ ऑगस्ट अखेर लाईव्ह नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार दि २० ऑगस्ट पुण्यतिथी दिनी सकाळी ६.५५ वा लाईव्ह शांतिदिप प्रज्वलन,विश्वशांती प्रार्थना, सकाळी ९ वा लाईव्ह श्री शांतिसागर विधान,दुपारी ३.०० वा.वात्सल्य वारिधि,जिनधर्म प्रभावक, राष्ट्रगौरव प पू १०८ आचार्य श्री वर्धमानसागरजी महाराज यांचे मंगल प्रवचन लाईव्ह होणार असून सायंकाळी ७.०० वा लाईव्ह भक्तिसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पुण्यतिथीनिमित्त ऑनलाइन पाठशाळा अंतर्गत व खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कोरोना महामारीमुळे यावर्षीची पुण्यतिथी वीर सेवा दल सदस्य,श्रावक श्राविका,धर्मबंधु यांनी घरातूनच साजरी करावी असे आवाहन वीर सेवा दलाचे चेअरमन शशिकांत राजोबा, व्हा.चेअरमन भुपाल गिरमल,सेक्रेटरी एन.जे.पाटील, जॉ.सेक्रेटरी डॉ रावसो कुन्नुरे,मुख्य संघटक सुभाष मगदूम यांनी केले आहे
 
Top