चाल अन ताल सत्तेच्या राजकारणाचा......


नाद कोणाचाही करा, 
तो कोणत्याही कळपात असो, 
मुंबई ,कोंकण विदर्भ मराठवाडा 
वा पश्चिम महाराष्ट्रात कराड कोल्हापूर
वा नगर बारामती सोलापूर सांगलीचा असो
तिथे कळपात जाताच भान शान हरपून जाते,
तो खुळा होतो, खुळा होताच तो 
नादाला लावतात ,तो भ्रमात जातो
अस्तित्वशून्य होतो, मग त्यास पात्र समजतात 
मेंदूची नसबंदी करतात, 
खात्री होताच त्यांस भरती करतात 
आणि त्यांच्या कळपात खेळवतात 
मग तो आरती भजन कीर्तन लावणीत,
गरजेनुसार सांगेल तिथे रमतो 
नेता वा वारसदार यांना देव मानत  
दरबारात जागा मिळवतो,आतून तो वाकून असतो 
बाहेरून मात्र पोकळ डरकाळ्या फोडतो
वेळ येताच हात जोडतो 
तो न खेळता मैदान गाजवतो 
तोच तर आशीर्वादाने वाढवलेला 
पोकळ वासा असतो, तो स्वतंत्र कोठें असतो 
तो तर बडवलेला बैल असतो !!

आंनद कोठडीया,जेऊर ता.करमाळा
९४०४६९२२००


 
Top