साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जयंती

 पंढरपूर,(प्रतिनिधी)- साहित्यरत्न सत्यशोधक आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.
   
   यावेळी मातंग समाजाचे युवक नेते अमित अवघडे, शिवबुद्ध युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे,पंढरपूर शहर युवक शहराध्यक्ष अजय गुंड, अ.भा.युवक मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुमित शिंदे, देवराज युवा मंचचे अध्यक्ष शहाजी शिंदे,किरण शिंदे,मातंग समाज बांधव उपस्थित होते. लाॅकडाऊन काळातील नियम सोशल डिस्टनसिंग पाळून साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
 
Top