प्रांताधिकारी  सचीन ढोले सपत्नीक रॉपीड टेस्ट देताना


नगरसेवक सचिन मुजावर, नगरसेवक सचिन शिंदे, माजी नगरसेवक गणेश आधटराव

     पंढरपूर - पंढरपूरामध्ये लॉकडॉउनच्या काळामध्ये जास्तीत जास्त रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात येत आहेत. याचाच परिणाम कोरोना असणारे नागरिक कळत आहेत, समोर येत असून  त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. यामुळे कोरोनाची साखळी शोधण्यास व थांबवण्यासाठी आपणास यश येईल. या नागरिकांना घरामध्ये व्यवस्था असल्यास घरातच आयसोलेशनची सुवीधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. घरातील जेवण घेऊन औषध उपचार घेऊन हे नागरिक काही दिवसात ठणठणीत बरे होतील. गरज भासल्यास अँडमीटही करावे लागेल. सर्व नागरिक दुकानदार, कामगार , पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी, भाजीपाला विक्रेते अत्यवश्यक सेवेत काम करणारे नागरिकांनी पुढे यावे असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.  
     
 
    या सर्व गोष्टी सुरळीत चालु असताना काही नागरिक अनावश्यक ताण घेत असताना निर्दशनास येत आहे.त्यामुळे नुकसान होऊ शकते. कोरोनाचा संसर्ग नेमके कोणाला झाला हे सांगणे कठीण आहे कारण ८०% नागरिक असिम्टमेटिक असल्याचे दिसत आहे. पण ज्या वेळी आपणास कळते आपण पॉझिटीव्ह आहोत अशावेळी आपल्या सभोवतालचे नागरिक मित्र परिवार यांची खुप मोठी जबाबदारी असुन त्यांनी संसर्ग झालेल्या व्यक्तीला अनावश्यक फोन न करता, योग्य तो धीर दिला पाहिजे.घाबरुन कोरोनावर मात करता येणार नाही. सुरक्षीत अंतर ठेऊन,मास्क वापरुन आपणास मार्ग काढायचा आहे. कोणी जर वैद्यकीय सेवेसाठी सोलापूर किंवा पुण्याला गेल्यास आता काही खरे नाही असे न समजता त्यांनाही धीर द्यावा. कोणालाही कोरोनाची बाधा झाल्यास ती त्याची चुक नसून नजरचुकीने कोणाच्या तरी संपर्कात आल्यामुळे झालेली असते. अशा नागरिकांना आपण योग्य मार्गदर्शन केल्यास, धीर दिल्यास, ते नागरिक आनावश्यक ताण घेणार नाहीत व संभाव्य धोका टळू शकेल व घरातील सर्व प्रिय सदस्य व मित्र परिवारही सुरक्षित राहतील. कोरोनाचा संसर्ग झाला म्हणजे काही विशेष झाले हे आपल्या मनातून काढले पाहिजे. यातील चांगल्या गोष्टी लोकांच्या मनात रुजवणे गरजेचे आहे. 


    सभोतालचे नागरिकांनी कोरोना झाला म्हणजे त्या घराचे काही खरे नाही अशी चर्चा केली तर तिथे भितीचे वातावरण निर्माण होते. सदर व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. म्हणून सर्व नागरिकांना अवाहन आहे ,एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आली म्हणजे काही विशेष झाले असे न मानता, एकमेकांना सहकार्य करुन, सुरक्षित अंतर ठेऊन योग्य मार्गदर्शन करुन आपणास रुग्ण सेवा करावयाची आहे.


    तरी मी सर्व नागरिकांना अवाहन करतो कोरोना झाला तर न घाबरता आपल्या मित्र परिवाराला धीर देऊन योग्य मार्गदर्शन करुन कोणताही विचार न करता डॉक्टरांनी दिलेली औषधे घेणे,हलका आहार घेणे व पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक असल्याचे सांगावे. आपण असे केल्यास हीच खरी रुग्ण सेवा होईल व स्वतःचेही संरक्षण होईल.

   विवेक परदेशी,आरोग्य समिती सभापती, पंढरपूर नगरपरिषद  


 
Top