पंढरपुर हिंदू महासभेच्यावतीने आनंदोत्सव साजरा 

  पंढरपूर , दि ५/८/२० - श्री राम जन्मभूमि पूजन समारंभ आयोध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू असतानाच पंढरपूरात पंढरपुर हिंदू महासभेच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हिंदू महासभा भवनामध्ये श्रीराम नाम अंकीत शिलेचे पूजन हिंदुसभा नेते अभयसिंह इचगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम दिपप्रज्वलन व रामरक्षा पठण करून विविध मंत्रांच्या घोषात प्रभू रामाच्या प्रतिमेचे पूजन वारकरी संप्रदाय पाईक संघ राष्ट्रीय प्रवक्ते रामकृष्ण वीर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

या क्षणासाठी पाचशे वर्षे हिंदू समाज संघर्ष करत होता

   हिंदूंच्या जीवनातील हा दिवस परम भाग्य आहे आपण सर्वजण या महान राष्ट्रीय उत्थानाचे कार्य 'याची देही याची डोळा पाहू शकलो',या क्षणासाठी पाचशे वर्षे हिंदू समाज संघर्ष करत होता! आणि त्यासाठी प्राणांची आहुती दिली,असे उद्गार यावेळी इचगावकर यांनी काढले.

प्रभु रामचंद्रांच्या श्रीराम जन्मभूमीसाठी वारकरी संप्रदायाने आपले योगदान दिले

  'रामकृष्ण हरी' वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र आहे.या मंत्रातील प्रभु रामचंद्रांच्या श्रीराम जन्मभूमीसाठी वारकरी संप्रदायाने आपले योगदान दिले.वै.विवेकानंद महाराज वासकर, साखरे महाराज, देगलूरकर महाराज,अनिलकाका बडवे यांचे योगदान कोणी विसरू शकणार नाही, असे भावपूर्ण उद्गार रामकृष्ण वीर महाराज यांनी काढले . 

    व्यासपीठावर श्रीप्रभू श्रीराम ,विठ्ठल रुक्मिणी, छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी पंढरपूर हिंदूसभा अध्यक्ष बाळकृष्ण डिंगरे, पत्रकार महेश खिस्ते,विवेक बेणारे ,महेश भंडारकवठेकर आदी उपस्थित होते.दिवसभरात प्रशांत खंडागळे, दीपक कुलकर्णी, गणेश लंके,  सचिन पाटील आदींनी दर्शनाचा लाभ घेतला. 

    यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकिय नियमांना सन्मान देत सोशल डिस्टंसिंगचे पालन, मास्कचा वापर आदी नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.
 
Top