जिल्हाधिकारी निधी चौधरींची आदर्श अन् अनुकरणीय कृती

  अलिबाग,जि.रायगड,दि.०२/०८/२०२०,(जिमा का) - महसूल दिनाचे औचित्य साधून तसेच नुकतेच निधन झालेले रोहा तहसील कार्यालया तील नायब तहसिलदार संजय नागावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग उपविभागीय अधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते.

शिबिरात सर्वप्रथम स्वतःच रक्तदान केले जिल्‍हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी

       मात्र या शिबिराचे वैशिष्ट थोडेसे आगळेवेगळे होते, ते म्हणजे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. त्यांची ही कृती निश्चितच अनुकरणीय आहे. कराेना चे संकट, त्यात निसर्ग चक्री वादळाने केलेली वाताहत या सर्व आघाड्यांवर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी धडाडीने काम करीत आपली नेतृत्व क्षमता आधीच सिद्ध केली आहे. मात्र आजच्या महसूल दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सर्वप्रथम स्वतःच रक्तदान करून  जिल्‍हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी "Leaders Speaks With Action"  याचा सर्वांना  प्रत्यय आणून दिला.

    या निमित्ताने कराेना विरुद्धच्या युद्धात उत्कृष्ट काम केलेल्या महसूल अधिकारी- कर्मचाऱ्यांचाही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

      या रक्तदान व आरोग्य शिबिरासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने,प्रांताधिकारी शारदा पाेवार,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, तहसिलदार सचिन शेजाळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

       महसूल दिनाचे औचित्य आणि राेहा तहसील कार्यालयाचे कै.नायब तहसिलदार संजय नागावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज सर्व तहसील कार्यालयांमध्ये रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते, त्यास सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
 
Top