लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये खर्डीचे नाव उज्ज्वल

खर्डी ,(अमोल कुलकर्णी)- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये खर्डी, तालुका पंढरपूर येथील राहुल लक्ष्मण चव्हाण याने १०९ वा क्रमांक मिळवून खर्डी, पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 

             
           (छाया:- अमोल कुलकर्णी)

राहुल यांचे प्राथमिक शिक्षण, खर्डी तर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण सिताराम महाराज विद्यालय खर्डी आणि सातवी ते दहावी द ह कवठेकर प्रशाला, पंढरपूर येथे पूर्ण झाले.आई-वडील शेतकरी असतानाही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर राहूल याने पुणे येथील वाडिया कॉलेज मध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला पण शारीरिक तंदुरुस्ती नसल्याने आणि थोड्या तांत्रिक अडचणी मुळे त्याने बारावीनंतर कला शाखेमध्ये पुणे येथे प्रवेश घेतला. तेथील असणाऱ्या युनिक अकॅडमी मध्ये शिक्षण घेऊन दोन वेळा परीक्षा देण्याचा प्रयत्न केला .पूर्व प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झाला परंतु मुख्य परीक्षेत मुकावे लागले. २०१९ -२० साठी घेतलेल्या तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झाला.देशात १०९ वा क्रमांक मिळवल्याने खर्डी येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गगनगिरीनगर येथील त्यांच्या चव्हाण वस्ती येथे विविध मान्यवरांची सत्कारासाठी गर्दी जमली होती.पंढरपूर येथील गणेश धांडोरे सरांच्या टाँपर्स क्लासचे ते विद्यार्थी आहेत. 

 यावेळी जिल्हयाचे आमदार प्रशांत परिचारक, खर्डीचे सरपंच रमेश हाके ,उपसरपंच प्रणव परिचारक यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांना शिकवणारे प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व माध्यमिक शाळेच्या शिक्षकांनी त्याला शुभाशिर्वाद दिले.
 
Top