देशात खेळण्यांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी बोलावली बैठक

 नवी दिल्ली,(PIB Mumbai)-भारतीय संस्कृती आणि नीतिमूल्याची सांगड घातलेल्या खेळण्यांचा वापर अंगणवाडी केंद्रे आणि शाळांमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक साधने म्हणून करण्यात यावा,असे सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

    ‘एक भारत,श्रेष्ठ भारत’भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी खेळणी एक उत्कृष्ट माध्यम ठरू शकतात.खेळण्यांचे तंत्रज्ञान आणि रचनेतील नवकल्पनांसाठी हॅकेथॉन आयोजित करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. 

  भारतीय संस्कृती आणि लोककथेतून प्रेरित असे खेळ विकसित करून डिजिटल गेमिंग क्षेत्रातील प्रचंड संधी भारताने हेराव्यात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगून भारतीय खेळण्यांची निर्मिती आणि जागतिक ओळख निर्माण करण्याच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतात विविध खेळण्यांचे समूह आहेत आणि हजारो कारागीर आहेत जे देशी खेळणी तयार करतात ज्यामुळे केवळ सांस्कृतिक नाही तर लहान वयातच मुलां मध्ये जीवन-कौशल्य आणि मानसिक जडणघडण विकसित करण्यात मदत होत असून अशा क्लस्टर्सना नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील पद्धतीने प्रोत्साहन देण्यात यावे .

   भारतीय खेळण्यांच्या बाजारपेठेत प्रचंड क्षमता आहे आणि आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ‘व्होकल फॉर लोकल’ ला प्रोत्साहन देऊन या उद्योगात परिवर्तन घडवून आणता येईल अशी माहिती देण्यात आली.तंत्रज्ञान आणि नाविन्यतेच्या वापरावर तसेच जागतिक निकषांची पूर्तता करणाऱ्या दर्जेदार उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले.

  पंतप्रधानांनी नमूद केले ‘एक भारत,श्रेष्ठ भारत’ या भावनेला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी खेळणी एक उत्कृष्ट माध्यम ठरू शकते. खेळण्यां मध्ये भारताची मूल्य व्यवस्था आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रस्थापित पर्यावरण-स्नेही दृष्टिकोन प्रतिबिंबित व्हायला हवा असे आवाहन त्यांनी केले.विशेषत: जे प्रदेश हातांनी घडवलेल्या खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहेत तिथे भारताच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी पर्यटनाचा एक साधन म्हणून उपयोग करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी केली.

    वेगाने वाढणाऱ्या डिजिटल गेमिंग क्षेत्रावर भर देताना पंतप्रधान म्हणाले की,भारताने या क्षेत्रातील मोठ्या संधींचा फायदा घ्यावा आणि भारतीय संस्कृती आणि लोककथेतून प्रेरित असे खेळ विकसित करून आंतरराष्ट्रीय डिजिटल गेमिंग क्षेत्राचे नेतृत्व करावे.
 
Top