सोलापूर जिल्ह्याचे आमदार व युटोपियन शुगर्सचे मार्गदर्शक प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना माजी सैनिक शिवाजी माने सो.यांचे समवेत रक्त-दाते, युटोपियन शुगर्सचे सर्व अधिकारी,खाते-प्रमुख व कर्मचारीपंढरपूर:सोलापूर जिल्ह्याचे आमदार व युटोपियन शुगर्सचे मार्गदर्शक प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार  दि. ११/०८/२०२० रोजी युटोपीयन शुगर्स लि.कचरेवाडी ता.मंगळवेढा येथे पंढरपूर ब्लड बँक यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक शिवाजी माने यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी युटोपियन शुगर्स चे सर्व अधिकारी, खाते-प्रमुख,व कर्मचारी उपस्थित होते.या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला . कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर स्वछ वातावरणात गर्दी टाळत सोशल डिस्टनसिंग चे पालन करीत या शिबिराचे आयोजन केले होते.

     युटोपियन शुगर्सद्वारे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.राज्यात दररोज पाच हजार लोकांना रक्ताची आवश्यकता असते. कोरोंनामुळे नियमित चालणार्‍या रक्तदान शिबिरांना फटका बसला असल्याने राज्यात अवघ्या १५-२० दिवसांचाच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती सरकार कडून देण्यात आल्याने अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन युटोपियन शुगर्स प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते .याप्रसंगी रक्तदान केलेल्या व्यक्तींना सँनिटाईजर,हेल्मेट,पाण्याचे जार या सारख्या वस्तु भेट म्हणून देण्यात आल्या. 

  या रक्तदान शिबिरास पंढरपूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी सदिच्छा भेट देऊन शिबिराची पाहणी केली व आभार व्यक्त केले.
 
Top