कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाला न घाबरता आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत

     पुणे,०५/०८/२०२० - राज्यासह,देशावर कोरोनाचे मोठ संकट आले आहे,यात आपल्या महाराष्ट्रमधील कोणत्याही व्यक्तीस हा संसर्ग होऊ नये म्हणून २४ तास सलग १५-१५ दिवस आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाची काळजी न घेता पोलीस खात्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी बंदोबस्तवर कर्तव्य बजावत होते. या कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाला न घाबरता आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत कर्तव्य बजावत होते.

 शहिद कोरोना योद्धा पुरस्कार घोषित करावे 

 कर्तव्य बजावत असताना त्यांनी आपल्यालाही कोरोनाची लागण होईल याची ही त्यांनी फिकर केली नाही.यात कोरोनाची लागण काही अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना झाली.काही या कोरोना आजाराला हरवून घरी आले तर काही त्यात मृत्यू पावले.या मृत्यू पावलेले अधिकारी व कर्मचारी यांना शहिद कोरोना योद्धा पुरस्कार घोषित करावे आणि त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी,असे निवेदन भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे प्रदेश जनसंपर्क प्रमुख अजित संचेती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवले आहे.  
 
Top