महापौर सौ.कांचना यन्नम यांनी प्लाझ्मा दान संमतीपत्र अभियानात फॉर्म भरला

सोलापूर - सोलापूर शहराच्या महापौर सौ. कांचना रमेश यन्नम यांनी त्यांचे पती रमेश यन्नम यांचेसह भारतीय जैन संघटनेच्या प्लाझ्मा दान संमतीपत्र अभियानात फॉर्म भरून राज्य उपाध्यक्ष केतनभाई शहा यांच्याकडे शहराचा प्रथम नागरिक ह्या नात्याने दिला.

महापौर यांनी सोलापूरकरांना आव्हान केले की आमच्यासारखे तुम्ही कोरोनावर मात करून बरे झाला आहात आता तुम्ही प्लाझ्मा दान दिल्यास दुसऱ्यांचे जीव वाचवू शकतो,म्हणून सर्वं कोरोना होऊन बरे झालेल्यानी स्वःतहून भारतीय जैन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे संमतीपत्र भरून द्यावे व इतर रुग्णांचे जीव वाचवावेत असे आवाहन केले. प्लाझ्मा दान देणार्यांना शासन प्रवास खर्च म्हणून २००० /- रूपये रोख देत आहे.
कोरोनातुन पूर्ण बरे झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतले जाते.रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाज्मा वेगळे केले जातात . यानंतर या प्लाज्मा कोरोंनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इन्जेक्ट केल्या जातात त्यामुळे रुग्णाची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते. प्लाज्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा आहे हे डॉक्टर ठरवतात. मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषधो पचारांनी बरा न होणारा गरज असणारा रुग्ण यासाठी निवडला जातो. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाज्मा थेरपीचा वापर वापर व्यापक प्रमाणात सुरू झाला असून महाराष्ट्रासह जगभरात ही पद्धती वापरण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाज्मा दान करावे असे शासनाच्यावतीने वारंवार आवाहन करण्यात येत होते.

त्या आवाहनाला प्रतिसाद देत दि,११/०८/२०२० रोजी सोलापूर शासकीय रुग्णालयात ( छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ) येथे भारतीय जैन संघटनेतर्फे प्रथम प्लाज्मा दान देण्याचा मान संघटनेचे विभागीय अध्यक्ष शाम पाटील यांना मिळाला आहे.त्यांनी स्वेच्छेने प्लाज्मा दान देऊन सर्वाना प्लाझ्मा दान देण्याचे आव्हान केले आहे. शाम पाटील यांना शासनातर्फे सन्मानपत्र देण्यात आले आहे.


यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष केतनभाई शहा, डॉक्टर सुशील सोनवणे ,डॉक्टर स्नेहा मॅडम विनायक कुलकर्णी,प्रिया पाटील,धनश्री पानपट, अजिंक्य बालस्वरूप, विक्रांत बनशेट्टी उपस्थित होते. सर्व प्लाझ्मा दानदात्यांचे भारतीय जैन संघटनेच्यावतीने केतनभाई शहा,राज्य उपाध्यक्ष यांनी आभार मानले आहेत.
 
Top