अविनाश साळुंखे , दत्ता पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार

पंढरपूर (प्रतिनिधी)- येथील पत्रकार अविनाश साळुंखे यांना पत्रकारितेतील आदर्श पत्रकार तर दत्ता पाटील यांना मुद्रण व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने हे पुरस्कार, हभप रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष रामचंद्र सरवदे, कार्याध्यक्ष राधेश बादले पाटील आदी उपस्थित होते.

   महाराष्ट्र राज्य सुरक्षा समितीच्यावतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये पंढरपूरचे पत्रकार अविनाश साळुंखे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार तर पंढरपूर येथीलच मुद्रक व्यवसायिक दत्त प्रिंटर्सचे मालक दत्ता पाटील यांना आदर्श मुद्रक म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंढरपूर येथील श्रीसंत कैकाडी महाराज मठामध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हे पुरस्कार संबंधितांना प्रदान करण्यात आले. ह.भ.प. रामदास महाराज जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. तीन महिन्यापूर्वी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. राज्यात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सोलापूर येथे १५ मार्च रोजी होणारा, पुरस्कार वितरण सोहळा रद्द करण्यात आला होता. 

     अविनाश साळुंखे हे सध्या दै.दामाजी एक्सप्रेस या दैनिकाच्या पंढरपूर विभागाचे विभागप्रमुख पदाची जबाबदारी संभाळत आहेत.

पंढरपूर तालुक्यात आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवून काळानुरूप बदल करीत, दत्त प्रिंटर्स या फर्मचे कुशल आणि उत्तम व्यवसायिक दत्ता पाटील यांच्या अफाट कार्यशक्तीमुळेच कार्याचा गौरव महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीकडून पुरस्कार देऊन करण्यात आला .

    या कार्यक्रमास पत्रकार अपराजित सर्वगोड, यशवंत कुंभार,विजय कांबळे,राजेंद्र काळे, बाहुबली जैन, सुदर्शन खंदारे, रवी शेवडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
 
Top