पंढरपूर नगरपरिषदचेवतीने ६५ एकर भक्ति सागर येथे कोविड केअर सेंटर सुरू


पंढरपूर नगरपरिषदचेवतीने ६५ एकर भक्ति सागर येथे कोविड केअर सेंटर गुरुवार दि २७/०८/२०२० रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू करण्यात येत आहे.या कोविड सेंटरमध्ये ५० बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे.जर रुग्णांची संख्या वाढली तर भविष्यात शंभर बेडची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे. सर्व बेडला ऑक्सिजनची ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.डॉक्टर व स्टाफ यांना राहण्यासाठी सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.  

  पंढरपूर नगरपरिषदेने शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता हे कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय आमदार प्रशांत परिचारक यांनी घेतला होता व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पक्षनेते यांना सर्वसाधारण सभा बोलवून मंजुरी घेण्याचा सूचना दिल्या होत्या .यावर नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक यांनी एकमताने नगरपालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये यास मंजुरी दिली होती.त्यानुसार या कामास वेगाने सुरुवात करण्यात आली होती . या कामासाठी  नगरपरिषद ने आतापर्यंत अंदाजे ५५ लाख रुपये खर्च केला असून पंढरपूर शहरातील रुग्णांना अतिशय चांगली वैद्यकीय सेवा व औषधोपचार व्यवस्था मिळावी या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले आहेत. या कामा साठी आमदार प्रशांत परिचारक,आमदार भारत भालके ,खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,  खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्याही आमदार खासदार निधीमधून या सेंटरला आर्थिक मदत करण्यात आली आहे.आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन,पंढरपूर) च्यावतीने ३० फावलर्स बेड ,नगराध्यक्ष सौ साधनाताई नागेश भोसले व नागेश भोसले मित्र मंडळाच्यावतीने २० फावलर्स बेड व १०० पीपीइ किट दिले आहेत. त्याचे उद्घाघाटन २७/०८/२०२० रोजी सकाळी १०.३० वाजता नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांचे अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव  मुख्याधिकरी अनिकेत मानोरकर ,पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे व सर्व सभापती व नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत  पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करून संपन्न होणार  असल्याची माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली आहे. 
 
Top