स्वातंत्र्यसैनिकांचा राष्ट्रपतींच्यावतीने  जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

      पालघर दि.०९/०८/२०२० - ऑगस्ट क्रांती दिनांचे औचित्य साधून पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी जव्हार शहरातील स्वातंत्र्य सैनिक रविंद्र (भाई) वैद्य, अंबादास मेतकर व स्वतंत्र सैनिक कै. सदाशिव घोलप यांच्या पत्नी रेणुका घोलप यांचा घरी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपतींच्यावतीने सत्कार करण्यात आला.

राष्ट्रपती महोदयांनी केलेल्या सुचनेनुसार आपले कर्तव्य समजुन आंम्ही घरी जाऊन स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करीत आहोत, देशापरी त्यांनी केलेले कार्य महान आहे ,त्यांचा सत्कार करणं हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, असे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी यावेळी केले.

   याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी प्रजित नायर, तहसिलदार संतोष शिंदे आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.
 
Top