समान संधी आयोगाची स्थापना करण्यासाठी जनता पार्लमेंटच्या सदस्यांनी पाठपुरावा करावा... आ.डॉ.नीलम गोऱ्हे

सर्वप्रथम जनता पार्लमेंटच्या कार्यक्रमात मला आमंत्रित केल्याबद्दल संयोजकांचे आभार मानते. मागील १८ वर्षापेक्षा अधिक कालापासून माजी विधानपरिषद उपसभापती आ.डॉ.नीलम गोऱ्हे ह्या विधिमंडळात आहेत. त्यामुळे मुंबई/नागपूर येथे होणाऱ्या प्रत्येक अधिवेशनात या प्रश्नांवर विशेषतः शेतकरी आत्महत्येवरील चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला असल्याचे सांगितले. प्राधान्याने शेतकरी आत्महत्या त्यांच्या विधवांची दुरवस्था याबाबी शासनस्तरावर व विधीमंडळ स्तरावर मांडल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील आत्महत्येमागे सावकारीचे प्रश्न

शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हे राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आत्महत्येमागे सावकारीचे प्रश्न आहेत. कोंकणात तुलनात्मकेतेने आत्महत्येचे प्रमाण कमी आहे.

जनता पार्लमेंटचा ठराव अभ्यासलेला असून त्यातील काही मुद्दे महत्वाचे असल्याचे आ.डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी सांगितले आहे. राज्य स्तरावर आणि राष्ट्रीयस्तरावर सदरील ठरावाचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एक महिला व सामाजिक कार्यकर्ते म्हणून माझ्या निदर्शनास आले आहे की सर्व क्षेत्रातील विशेषतः कृषी क्षेत्रातील महिलांचे योगदान हे दुर्लक्षित राहिले आहे.किसान क्रेडिट कार्डमध्ये भूमिहीनांना समाविष्ट करणे स्वागतार्ह राहील. तसेच महिलांना उपयुक्त कृषी विषयक अवजारे पंचायत स्तरावर उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. कष्ट कमी करणारी ही उपकरणे पुरविणेबाबत आ.डॉ.गोऱ्हे ह्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषीमंत्री दादा भुसे व ग्रामविकास विभागाकडेही पाठपुरावा करणार आहेत.

   निर्णय प्रक्रियेत महिला शेतकऱ्यांच्या सहभागा बाबत 'मकाम' या संस्थेने उत्कृष्ट कार्य केले आहे. मागील काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनात आ.डॉ.गोऱ्हे ह्या सहभागी झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्या नंतर सीमाताई कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांना विधानभवनात बोलवून कृषी व मदत पुनर्वसन मंत्र्यांसोबत त्यांची चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न आ.डॉ.गोऱ्हे यांनी केला. महिलांच्या कृषीविषयक प्रश्नांची अधिक नोंद घेतली जावी, आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांचे पुनर्वसन योग्य प्रकारे यासाठी आ.डॉ.गोऱ्हे पाठपुरावा करत असल्याचे या कार्यक्रमात त्यांनी सांगितले.

सर्व एकल महिलांना जॉबकार्ड मिळवून देण्याबाबत मोहीम हाती घेण्यात येणार 

रोजगार हमी योजनेअंतर्गत एकल महिलांचे प्रश्न त्यांना जॉबकार्ड पुरविणेबाबत मध्यंतरी रोहयो मंत्री संदिपान भुमरे व रोहयो आयुक्तांसोबत स्वयंसेवी संस्थांची बैठक घेतली. सप्टेंबर महिन्या पासून सर्व एकल महिलांना जॉबकार्ड मिळवून देण्याबाबत मोहीम हाती घेण्यात येत आहे. माहे जून मध्ये या योजनेत सहा लाख महिलांना काम मिळाले.

   संधीची समानता असणेसाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवर महिला समानसंधी आयोगाची Equal pay Equal opportunity आयोग स्थापना करून यास संस्थात्मक स्वरूप देणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी महिला, भूमिहीन महिला, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या महिला यांना मिळणारी मदत ही सन्मानाने व त्यांचे कोणत्याही प्रकारे शोषण न होता मिळणे आवश्यक आहे. समान संधी आयोगाची स्थापना करण्याची आ.डॉ. गोऱ्हे यांनी या कार्यक्रमात मागणी सरकारकडे करणार असून जनता पार्लमेंटने देखील मागणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 
Top