जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव


    अलिबाग,जि.रायगड,दि.०९/०८/२०२०, (जिमाका) - कृषी विभागाच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सवाचे आज अलिबाग एस. टी. स्टँड येथे आयोजन करण्यात आले हाेते.  


         या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन कृषी विभागाच्या आत्मा कार्यालयाचे उपसंचालक दत्तात्रय काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवाला तालुका कृषी अधिकारी श्री.बैनाडे,  सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक कल्पेश पाटील व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

     तसेच आजच्या या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमदार महेंद्र दळवी तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
 
Top