कृषी विभाग शेतकर्‍यांच्या सेवेत सदैव तत्पर

खर्डी,(संतोष कांबळे) -कोरोनाच्या कालावधीत शासनाने वेळोवेळी लाॕकडाऊन जाहिर केले . त्यामुळे कोरोनाचा प्रसार कमी झाला. या कालावधीत सर्वात जास्त नुकसान व जास्त झळ बसली असेल तर ती शेतकऱ्यांना परंतु काहीही नाराजी न दाखविता शेतकऱ्यांनी आपआपल्या शेतात काळजी घेत काम सुरुच ठेवले.त्यामुळे कृषी उत्पादनावर कसलाच परिणाम दिसला नाही.या कार्यकालात ज्या शेतकऱ्यांचे अनुदानाचे प्रस्ताव मोका तपासणी होऊन सादर झाले ते शेतकरी मात्र अनुदानापासुन वंचित राहिलेत उदा -प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (ठिबक सिंचन) ,मागेल त्याला शेततळे , राष्ट्रीय कृषी विकास योजना व एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत शेततळे अस्तरीकरण योजना ,रा कृ वि यो व ए फ अ अंतर्गत -कांदा चाळ , उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत -कृषी यांत्रिकीकरण योजना -ट्रॕक्टर ,रोटाव्हेटर ,ब्लोअर इ व एफविअ अंतर्गत -ट्रॕक्टर अनुदान ,एफवियो अंतर्गत -सामुदायीक शेततळे ,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ,फळबाग लागवड योजना इत्यादी अनेक कृषी विषयक योजनावर कृषी विभागानेदेखील या संकटकाळात कुठलीही भीती न बाळगता कृषी योजना व कृषी विस्ताराचे कार्य केले.


आता गरज आहे ती शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची

   आता गरज आहे ती शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची बरेच शेतकरी अनुदानासाठी बँकेत , कृषी आॕफीसमध्ये चकरा मारत आहेत.हा बळी राजा अनुदानापासुन वंचित राहु नये तसेच इथुन पुढे सुरु होणाऱ्या व प्रतिक्षेत असणाऱ्या योजना थांबु नयेत किंवा बंद होवू नयेत ,कारण सध्याच्या खरीपात पाऊस जरी चांगला झाला असला तरी काही ठिकाणी अतिपावसाने शेतमालाचे नुकसान झाले ,द्राक्षाच्या फवारण्या वाढल्या ,डाळींबाची कळ्या गळाल्या बर्याच पिकावर किड व रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यात खते किटकनाशके वेळेवर व योग्य किंमतीत मिळाली नाहीत त्यामुळे होते तेवढे किंवा कर्ज काढलेले पैसे संपले. आता खरच शासनाने यात लक्ष देण्याची गरज वाटत आहे, शिवाय ज्या नविन येणाऱ्या योजना आहेत त्या लवकर सुरु कराव्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात कृषीसाठी भरघोस तरतुद करुन लवकरच आपली भुमिका सादर करुन शेतकऱ्यांना धीर द्यावा व शेतमाल मार्केटिंग ,बाजार व्यवस्थेसाठी शेतकऱ्यांना फायदेशीर होईल अशी व्यवस्था अभ्यासुन अमलात आणावी. कारण मागील लाॕकडावुनमध्ये व्यापारी, दलालांनी शेतकऱ्यांना लुटले त्यामुळे मायबाप सरकार आपल्यासाठी काहीतरी करेल या आशेवर शेतकऱ्यांचे काम चालु आहे .
 
Top