तर वाहनात वैध फास्टॅग लावणे आवश्यक 


नवी दिल्‍ली,२६/०८/२०२० - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल नाक्यावरील परतीच्या प्रवासातील सूट किंवा इतर कोणतीही सूट मिळविण्यासाठी फास्टॅग अनिवार्य केला आहे. २४ तासांच्या आत परतीचा प्रवास करताना ज्या वाहनचालकांना (वापरकर्त्यांनी) सवलत किंवा इतर कोणतीही स्थानिक सूट हवी असेल,त्यांनी वाहनात वैध फास्टॅग लावणे आवश्यक आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर व संकलन निर्धारण) नियम, २००८ मध्ये सुधारणा करण्या साठी दि.२४ ऑगस्ट २०२० रोजी राजपत्र अधि सूचना क्र.534 E द्वारे सूचित करण्यात आले आहे.

   राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर डिजिटल पेमेंटच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी हे आणखी एक पाऊल आहे. अशा सवलतीसाठी देय शुल्क प्री-पेड इन्स्ट्रुमेंट्स, स्मार्ट कार्ड किंवा फास्टॅग किंवा बोर्ड युनिट (ट्रान्सपॉन्डर) किंवा इतर कोणत्याही इन्स्ट्रुमेंटद्वारे दिले जाईल.

नियमांमधील सुधारणांमुळे खालील बाबी शक्य होतील -  

तर कोणत्याही पासची आवश्यकता भासणार नाही

  २४ तासांच्या आत परतीच्या प्रवासावरील सूट फास्टॅग किंवा इतर अशा उपकरणांद्वारे दिली जाईल,कोणत्याही पासची आवश्यकता भासणार नाही.

इतर सर्व प्रकरणांवरील सूटसाठी,वैध फास्टॅग असणे आवश्यक आहे.

   २४ तासांच्या आत परतीच्या प्रवासासाठी सूट उपलब्ध असल्यास, अशा परिस्थितीत पूर्व पावती किंवा नोटीसची आवश्यकता नाही आणि जर वाहनावर वैध आणि कार्यशील फास्टॅग असल्यास त्या वाहनाने २४ तासात परतीचा प्रवास केला असेल तर नागरिकांना आपोआप सूट मिळेल.
 
Top