मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयाचे यश

पंढरपूर ,(नागेश आदापूरे )- सौ.सुनेत्राताई विजयसिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संचलित,मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय,गणेश नगर, पंढरपूरात सन १९९२ पासुन सुरू आहे . मार्च २०२० चा शाळेचा एस एस सी परीक्षेचा निकाल ९५% लागला असून प्रशालेतून एकुण ७७ मुले परीक्षेत बसले होते त्यापैकी विशेष प्राविण्य प्राप्त मुले ४२, प्रथम श्रेणी१७ , द्वितीय श्रेणीत १२ मुलांनी यश संपादन केले आहे .


   प्रशालेतुन प्रथम स्वप्निल भंडारे ९२% , द्वितीय कु. सानिका बाळासाहेब निंबाळकर ९१% ,तृतीय कु.श्रुती दिलीप कुलकर्णी ८७% गुणदान घेऊन उत्तीर्ण झाले आहेत .

     संस्था सचिव सौ.सुनेत्रताई विजयसिंह पवार यांचे हस्ते सत्कार 

       या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव सौ. सुनेत्रताई विजयसिंह पवार ,संस्था सल्लागार विजयसिंह प्रतापराव पवार, मुख्याध्यापिका सौ. नंदिनी विजयराव गायकवाड ,वर्गशिक्षिका सौ. विभावरी डुबल ,संस्था सल्लागार रवींद्र साळुंखे यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे.  
 
Top