विश्व साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा- आ.भारत भालके यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी


पंढरपूर ,(प्रतिनिधी)-विश्व साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे. यासाठी शासनाने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठविण्याची विनंती पंढरपूर-मंगळवेढा विधान सभेचे आ.भारत भालके यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.

शोषित वंचितांचा आवाज,क्रांतिकारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे


 शोषित वंचितांचा आवाज, भारतीय स्वतंत्र संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील क्रांतिकारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष विविध कार्यक्रमाने साजरे केले जात आहे. जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना सर्वोच्च मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी विविध स्तरातून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

  यावेळी आ.भारत भालके, बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश यादव,शहराध्यक्ष किशोर खिलारे, मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दशरथ यादव, उपाध्यक्ष पंढरीनाथ कदम,ॲड. बादल यादव,नाथा यादव आदी उपस्थित होते.
 
Top