करंज विहिरे ( ता. खेड, जि.पुणे) येथील थोपटवाडी येथे २४ जुलै, २०२० रोजी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा निर्घृण खुनातील आरोपीवर कडक कारवाई करण्याबाबत आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्री श्री देशमुख यांना पत्र

       पुणे,(डॉ कुणाल दोशी),दि.२७ जुलै,२०२०- करंज विहिरे(ता.खेड) येथील थोपटवाडी मधील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करण्यात आल्याची  घटना समोर आली आहे. दि.२४ जुलै, २०२० वार शुक्रवारी उशिरा विवस्त्र अवस्थेत या मुलीचा मृतदेह निर्जन स्थळी आढळून आला आहे होता. या प्रकरणात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करण्यात आहेत. याबाबत चाकण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांच्याशी शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरून संपर्क करून घटनेची सविस्तर माहिती घेतली. यात संशयित आरोपीला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. येथे शिवसेनेचे पदाधिकारी राम गावडे आणि श्रीमती विजया शिंदे या केसचा पाठपुरावा घेत आहेत. 

      आरोपीवर कठोर कारवाई करा

   सदरील घटनेत आ.डॉ.गोऱ्हे यांनी खालील कारवाई करण्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांना सूचना निवेदनात दिल्या आहेत

◆ आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी. 
◆ यात आणखी कोणी सामील आहे का याच तपास घेण्यात यावा.
◆ पीडित कुटुंबाला आर्थिक मिळल्यासाठी प्रयत्न करण्यात यावा.
◆ आरोपीचा पूर्वी अशा घटनेत सहभाग आहे का याची चौकशी करण्यात यावी. 
 
Top