कोल्हापूर येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये विनयभंग झाला मुलीचे समुपदेशन करण्याबाबत तसेच  अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी SOP तयार करून अंमलबजावणी करण्यात यावी...आ.डॉ.नीलम गोऱ्हे


  कोल्हापूर दि.२५ जुलै,२०२० - कोल्हापूर येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये वार्डबॉयने मुलीचा विनयभंग केल्याची घटना दि.२१ जुलै,२०२० रोजी समोर आली. पीडीत मुलीच्या फिर्यादीनुसार वॉर्डबॉय विरोधात एफआयआर दखल करून आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार अटक केली आहे. 

वॉर्डबॉय विरोधात एफआयआर दखल करून आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार अटक

  पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी योग्य तात्काळ कारवाई केल्याबद्दल आ.डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. असे असले तरी देखील मुलीचे समुपदेशन करण्याची सूचना आ. डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक श्री देशमुख यांना केली आहे. त्याप्रमाणे अशा घटना भविष्यात घटना घडू नयेत यासाठी Standard Operating Procedure ( SOP ) तयार करण्यात यावे असे सांगितले. तयार करण्यात येणाऱ्या SOP मध्ये कार्यप्रणाली वापरण्याची सूचना देखील आ.डॉ.गोऱ्हे यांनी श्री देशमुख यांना केली आहे.

                  घ्यावयाची दक्षता 

◆ एखादी एकटी महिला रूग्ण विलगीकरण होण्यास आलेली असल्यास त्या महीला रूग्णाला महिला सुरक्षा गार्ड, महिला डॉक्टर, महिला सफाई कर्मचारी आहेत अशा ठिकाणच्या कक्षात ठेवावे.

◆ज्या ठिकाणी महिला रूग्णांची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी महिला डॉक्टर, महिला सुरक्षा रक्षक व महिला सफाई कर्मचारी असणे आवश्यक करावे.

◆ विलगीकरण कक्षामध्ये ज्या ठिकाणी महीला रूग्णांना ठेवण्यात आलेले आहे त्या ठिकाणी महीलेस काही गोष्टींची अथवा मदतीची आवश्यकता असल्यास त्यासाठी  डॉक्टरांना तात्काळ संपर्क करण्यासाठी अलार्म वेलचे बटण ठेवावे. जेणेकरून प्रशासनातील अधिकारी/ कर्मचारी यांना तात्काळ माहीती मिळून त्यांचे कडून महिला रूग्णांचे मदतीला तात्काळ जाता येणे शक्य होईल.

◆  दररोज कोणत्या मजल्यावरील कोणत्या खोलीत कोणता रुग्ण दाखल आहे. याचा चार्ट विलगीकरण कक्षाचे ठिकाणचे व्यवस्थापकांनी दररोज अद्यावत करून तो दररोज संबंधित प्रशासन तसेच महानगरपालिका यांचेकडे पाठवणे आवश्यक करावे.तसेच यासह महिलांच्या सुरक्षेते साठी ज्या काही आवश्यक उपाययोजना करणे शक्य आहे ते करण्यात यावे.
 
Top