कोरोना दिवसेंदिवस आपला विळखा घट्ट करत आहे

   शेळवे,(संभाजी वाघुले)-कोरोना दिवसेंदिवस आपला विळखा घट्ट करत आहे.त्यामुळे कोरोना आजार समूळ संपविण्यासाठी प्रशासनाने वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांनी स्वच्छता राखणे , मास्क वापरणे,  सामाजिक अंतर ठेवणे आदी प्रतिबंधात्मक उपायांची अंमल बजावणी केली पाहिजे.योग्य काळजी घेतली तर आपण सुरक्षित राहु शकतो. कोणतेही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी. हा आजार उपचाराने पुर्ण बरा होणारा आहे. आजाराबाबत कुठलेही गैरसमज बाळगू नयेत.रुग्णांना तात्काळ उपचार उपलब्ध होण्या साठी व कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. 


    त्यावर पंढरपूर येथील आनंद मेनकुदळे यांची पुतणी वैष्णवी हीने आनंद मेनकुदळे यांच्या हातावर नागपंचमी निमित्त सँनीटायझर,मास्क, कोरोना व्हँक्सिन यांची मेहंदी काढली आहे .

              तुम्हीच योद्धा आहात 

वैष्णवी म्हणाली ,तुम्हीच योद्धा आहात असा विचार मनात आला आणि सहज सुचलं हातावर  मेहंदीच्या स्वरूपात आपण आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत . कारण पंढरपूरचे खरे योद्धे प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस विशाल जपे , आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, नगर पालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, कोवीड सेंटरमधील डॉ एकनाथ बोधले आणि त्यांचे सहकारी यांचे पंढरपूरकरांसाठी ह्या चार महिन्याच्या काळात मोठे योगदान आहे त्यांना मानाचा मुजरा म्हणून प्रातिनिधिक स्वरुपात काही  नावे यांची हातावर मेहंदी काढली आहे.
 
Top