मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज रोजी पुण्यात झाली बैठक


    पुणे , (डॉ कुणाल दोशी) - पुण्यामधील वाढत्या कोविड परिस्थितीच्या आणि वाढत्या रुग्णांच्या संदर्भामध्ये आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर व जिल्हा यांची बैठक घेतील.त्यावेळी आमदारांच्या बैठकीमध्ये डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुढील मुद्दे मांडले

१) या जिल्ह्यांमध्ये डॉक्टर्स व संघटनांच्या प्रतिनिधी व अधिकारी यांच्यासोबत एक कमिटी करण्यासंदर्भात २४ मे रोजी सरकारने परिपत्रक जारी केले. परंतु प्रत्यक्षामध्ये जिल्ह्यामध्ये बैठका होत असल्या तरीसुद्धा अशी कमिटी पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा व पुणे ग्रामीण येथे झालेली नाही. तशी डॉक्टरांचे सहभागाने ती कमिटी नेमावी.

२) IMA च्या पदाधिकार्यांसह अनेक डॉक्टरनी माझ्या लक्षात आणून दिलं डॉक्टर्स, पॅरामेडिकलचे लोक, नर्सेस यांना अनेक सहनिवास आणि अपार्टमेंट सोसायट्यांमध्ये आसपासचे लोक फार त्रास देत आहेत आणि त्यांना तिथे प्रत्येक ठिकाणी पोलिसांकडे तक्रार करणे शक्य नसते, म्हणून मी असं म्हटलं की प्रत्येक ठिकाणी सहकार विभाग, महानगरपालिकेचे उपायुक्त आणि पोलीस विभाग यांचा मिळून एक टास्क फोर्स प्रत्येक शहर आणि जिल्ह्यात करण्यात यावा आणि तिथे लोकांच्या तक्रारी मग तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक ,आमदार यांच्या मदतीने अशा सह निवासात डॉक्टरना,परिचारिकांना आणि त्याने मेडिकल स्टाफला लोकांचे सहकार्य मिळेल या दृष्टिकोनातून सरकारने उपाययोजना करावी.

३) २००९ च्या सुमाराला जेंव्हा स्वाइन फ्लू आला त्यानंतरच्या काळामध्ये केंद्र सरकारने औषधे मोफत उपलब्ध करून दिली होती त्याचप्रमाणे कोविडवरती आवश्यक औषध मोफत उपलब्ध करून द्यावीत .आम्हाला मुंबईच्या कूपर हॉस्पिटल मधून आभाराचा मेसेज आला की औषधे आता सरकारी रुग्णालयात मोफत मिळायला लागली आहेत. तशीच ती महाराष्ट्रभर सरकारी रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा विनामूल्य उपलब्ध व्हावीत आणि त्यांचा उपयोग करण्या साठी परवानगी असावी अशी विनंती आहे. सरकारने मुंबई त जो निर्णय घेतला तो महाराष्ट्रभर निर्णय घ्यावा असे डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

४) खाजगी हॉस्पिटलची विनंती आहे की अलगि करण करायचे असेल तर आधी हॉटेलबरोबर संलग्न करून तिथल्या व्यवस्थापनावर देखरेख करून त्यांची व्यवस्था वाढवण्याची त्यांची तयारी आहे. त्याबाबत सरकारने सकारात्मक पाऊले उचलावीत .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे यांचे केले अभिनंदन  

       मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील परिस्थिती आटोक्यात आणताना, धारावी व वरळी व इतर भागामध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली असे वाटत असताना ज्या प्रकारे उपाययोजना केल्या त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर बेडसची अडचण अनेक रुग्णांना झाली आहे. त्याच्यामुळे होणारी दिरंगाई दूर करण्यासाठी सगळ्याच आमदारांनी आग्रह धरला परंतु काही रुग्ण बरे होऊन गेले त्यांनी सुद्धा सरकारचे आभार मानलेले आहेत. ही भावना मुख्यमंत्र्यांकडे पोहचवली. पुणे शहरासाठी आपण काय करताय याबद्दल आमची सगळ्यांची आपल्याकडून अपेक्षा आणि प्रतीक्षा आहे त्याच्याकडे त्यांचे लक्ष वेधलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये सर्व आमदारांच्या मुद्द्यांचा परामर्श घेतला आणि बैठकीच्या शेवटी अधिकाऱ्यांची बैठक घेतली .
 
Top